आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:सम्मेद शिखरला तीर्थक्षेत्राचा दर्जा द्या

जामनेर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सम्मेद शिखरजी हे झारखंड राज्यातील जैन धर्मियांचे श्रद्धास्थान आहे. केंद्र सरकार व झारखंड सरकारने या पवित्र धार्मिक स्थळाला पर्यटनस्थळ घोषित केले आहे. यामुळे स्थळाचे पावित्र्य धोक्यात येईल. त्यामुळे पर्यटन नव्हे, या स्थळाला तीर्थक्षेत्र घोषित करावे अशी मागणी बुधवारी जैन समाजबांधवांनी केली. तत्पुर्वी समाजबांधवांनी तहसीलपर्यंत मोर्चा काढला होता.

सम्मेद शिखरजी या पवित्र स्थळाचा पर्यटनाचा दर्जा रद्द करून, तीर्थक्षेत्राचा दर्जा द्यावा, अशा मागणीचे निवेदन तहसीलदार अरुण शेवाळे यांना देण्यात आले. यावेळी सखल जैन समाजाचे अध्यक्ष ईश्वरलाल कोठारी यांचेसह सर्व समाज बांधव उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...