आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्कार:महात्मा फुले शाळेमध्ये गुणवंतांचा गौरव

धरणगाव15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील महात्मा फुले हायस्कूलचा यंदा शाळेचा दहावीचा १०० टक्के निकाल लागला असून यातील गुणवंतांचा ग्रंथ देऊन गौरव करण्यात आला. प्रास्ताविक दहावीचे वर्गशिक्षक पी. डी. पाटील यांनी केले. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक जे. एस. पवार होते. महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांना वंदन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. सर्वप्रथम शाळेतून प्रथम, द्वितीय, तृतीय आअलेल्या विद्यार्थ्यांचा पालकांसह ग्रंथ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

यामध्ये रोहन सुनील गजरे (९१%) या प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यासह राज मनोज पटुणे (८९.४०%), मयूरी साहेबराव पाटील (८७.८०%) यांचा गौरव करण्यात आला. विशेष प्राविण्यासह २४ मुले, प्रथम श्रेणीत १५ मुले, द्वितीय श्रेणीत ४ मुले उत्तीर्ण झाले आहेत. एस. व्ही. आढावे व मुख्याध्यापक पवार यांनी मार्गदर्शन करुन मुलांचे कौतुक केले. याप्रसंगी पर्यवेक्षक एम. बी. मोरे, ज्येष्ठ शिक्षिका पी. आर. सोनवणे, पालक कविता गजरे, वंदना गजरे, पार्वती पटुणे, आशा वर्कर अनिता पाटील, पी. डी. पाटील, सर्व कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन पी. डी. पाटील तर एस. एन. कोळी यांनी आभार मानले.

बातम्या आणखी आहेत...