आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहा दिवस पाेलिस काेठडी:शेळ्या चाेरणारे निघाले अट्टल चोर; पाच तालुक्यांत १७ गुन्ह्यांची कबुली

पारोळा6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील वंजारी शिवारातून २५ शेळ्या चाेरीची घटना १ ऑगस्ट राेजी उघडकीस आल्याने येथील पाेलिसांत चाेरीचा गुन्हा दाखल झाला. त्याचा तपास करत गुप्त माहितीनुसार पाेलिसांनी तालुक्यातील पळासखेडा येथील सहा जणांना अटक केली. चाैकशीत त्यांनी या गुन्ह्यासह एकूण १७ चाेरीच्या गुन्ह्यांची कबुली दिली.

महेंद्र उर्फ गणेश सुदाम पाटील (वय २८), वाल्मीक भगवान मराठे (२४), संजय साेमा जाधव (२७), अंकुश नेहरू पाटील (२३), राेशन महावीर पवार (१९) सर्व रा.पळासखेडे व शिवाजी रामराव पाटील (२५) रा.जामाेद, ता.जळगाव अशी या आराेपींची नावे असून अन्य दाेन अल्पवयीन आहेत. यांनी १ आॅगस्टच्या मध्यरात्री भैय्या सुदाम चाैधरी, रा.पाराेळा यांच्या वंजारी शिवारातील शेतातून १५ शेळ्या व १० बाेकड यांच्या चाेरीची कबुली दिली. त्यांच्या वाहतुकीसाठी त्यांच्या स्वत:च्या मालकीची दाेन बोलेरो वाहने वापरल्याचे निष्पन्न झाले. या आरोपींना अटक करून येथील न्यायालयासमाेर हजर केले. त्यांना ६ दिवसांची पोलिस कोठडी दिली. तपास पाेलिस अधीक्षक डाॅ.प्रवीण मंुढे, ऋषिकेश रावले, पाेलिस उपअधीक्षक राकेश जाधव, अमळनेर यांच्या मार्गदर्शनात पाेनि रामदास वाकोडे, पाेउनि राजू जाधव, शेखर डोमाळे करत आहेत.

आराेपींनी पाच पाेलिस ठाणे हद्दीत केले गुन्हे
या आराेपींनी पाराेळा पाेलिस ठाणे हद्दीत ६ गुन्हे, त्यात बकरी चाेरी, बैलचाेरी व ठिबक नळ्यांच्या चाेरीचे प्रत्येक २ असे एकूण ६ गुन्हे, अमळनेर पाेलिस ठाणे हद्दीत ठिबक नळ्या, धरणगाव पाेलिस ठाणे हद्दीत ६ चाेऱ्या तसेच एकूण ४ बैलजाेड्यांची चाेरी, चाेपडा शहर पाेलिस ठाणे हद्दीत ३ गुन्हे, त्यात २ माेटारसायकली व डी फ्रीज, जळगाव तालुका पाेलिस ठाणे हद्दीत ठिबक नळ्यांच्या चाेरीची कबुली दिली. पोलिसांनी ६ गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत केला. अन्य मुद्देमालाचा तपास सुरू आहे. दरम्यान या चाेरीच्या घटनांपैकी काेणी फिर्याद दिली नसेल त्यांनी त्वरित संबंधित पाेलिस ठाण्यात फिर्याद द्यावी, असे आवाहन येथील पाेलिसांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...