आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वच्छतागृहाची मागणी:गोद्रीत महिलांनी अडवला जिल्हाधिकाऱ्यांचा ताफा

जामनेरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छतागृह मिळावे या मागणीसाठी गोद्री येथील महिलांनी, सोमवारी जिल्हाधिकारी अमन मित्तल यांचा ताफा अडवला. यामुळे पोलिस प्रशासनाची तारांबळ उडाली.

गोद्री येथे जानेवारी महिन्यात होत असलेल्या बंजारा समाजाच्या कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी, जिल्हाधिकारी अमन मित्तल सोमवारी सायंकाळी गोद्री येथे आले होते. धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांसह यात्रेच्या जागांची पाहणी जिल्हाधिकाऱ्यांनी केली. तेथून गोद्री येथे जात असताना महिलांनी वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छतागृह मिळावे, या मागणीसाठी ताफा अडवला. समस्या सोडवण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. त्यानंतर महिलांनी मार्ग मोकळा केला. तहसीलदार अरुण शेवाळे, पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे हजर होते.

बातम्या आणखी आहेत...