आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापोहरादेवी येथे तीन हजार ब्राह्मणांच्या साक्षीने लक्षचंडी महायज्ञ केला होता. त्यावेळीही काही नागरिकांनी विरोध केला होताच. पोहरादेवी ही समाजाची काशी आहे, ती कायमच राहणार आहे, यात कुठलीही शंका नाही. त्यामुळे गोद्री येथे होणाऱ्या कुंभाबाबत कुणी कितीही विरोध केला तरी काळजी करू नका, आपले कार्य सुरूच ठेवा, असा संदेश पोहरादेवी संस्थाचे गादी-पती बाबुसिंग महाराज यांनी शुक्रवारी कुंभ स्थळाच्या भूमिपूजन समारंभप्रसंगी दिला.
ज्या वेळी समाजाची हानी होते, त्या वेळी संत समाजाच्या पाठीमागे उभे रहातात. आज समाज भरकटला आहे. आपली संस्कृती, चालीरीतींचे पुढील पिढीला ज्ञान व्हावे, यासाठी अशा कुंभाच्या आयोजन गरज पडते. त्यामुळे गोद्री येथे जानेवारी महिन्यात बंजारा, लबना नायकडा समाजाच्या महाकुंभाचे आयोजन केले आहे. संपूर्ण भारतातून या कुंभास माेठ्या संख्येने समाजबांधव येणार आहेत, असे पोहरागडचे गादी-पती बाबुसिंग महाराज यांनी व्यक्त केले. या वेळी पाल आश्रमाचे गादी-पती गोपाल चैतन्यजी महाराज, महामंडलेश्वर जनार्दन स्वामी, सुरेश महाराज, रामसिंग महाराज, सुंदरसिंग महाराज, विष्णू महाराज, मुक्तानंद महाराज, दिव्य चैतन्य महाराज, हरीश चैतन्य महाराज, नवनीत चैतन्य महाराज, चैतन्य महाराज, रामचरण महाराज आदी हजर हाेते.
परमेश्वर पाठीराखा ... संत संकल्प पूर्ण करण्यासाठी परमेश्वर पाठीशी असतो. गोद्री येथील कुंभ ही संतांनी आयोजित केला आहे. कुठल्याही राजकीय पक्ष किंवा संघटनेचा हा कार्यक्रम नाही. सर्व समाज एकत्र आणणे हाच, या कुंभाचा उद्देश असल्याचे मत शाम चैतन्य महाराज म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.