आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजुलै महिन्यापासून ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत संपूर्ण चाळीसगाव तालुक्यातील सर्व महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे. ज्यात पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांना बसलेला आर्थिक फटका लक्षात घेता शासनाने तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना सरसकट भरपाई द्यावी, अशी मागणी चाळीसगाव तालुका शेतकरी कृती समितीने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
या वेळी विवेक रणदिवे, शिरसगावचे चंद्रकांत पाटील, पिंप्रीचे सुभाष पाटील, पिलखोडचे ज्ञानेश्वर पाटील, आडगावचे सरपंच रावसाहेब पाटील, डोणचे गोरख पारधी बोढरे येथील पंडीत चव्हाण, जगन्नाथ शिंपी, समाधान सूर्यवंशी, अजय लोहार, नाना पाटील, नारायण पाटील, भास्कर पाटील, तुकाराम पाटील, दौलत कोळी, बापू चव्हाण आदी उपस्थित होते.
या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे तहसीलदार अमोल मोरे यांना शेतकऱ्यांनी निवेदन दिले. दरम्यान, संपूर्ण तालुक्यातील खरीप हंगामातील पीक वाया गेल्याने शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा व हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना तत्काळ सरसकट नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी कृती समितीने केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.