आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरस्काराने गाैरव‎:पातोंडा विकास मंचची शासनाने घेतली दखल‎

पातोंडा‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पातोंडा परिसर विकास मंचला‎ महाराष्ट्र शासनाचा महसूल व वन‎ विभागाच्या वतीने विभागीय छत्रपती‎ शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार‎ प्रजासत्ताक दिनी प्रदान करण्यात‎ आला.‎ नाशिक येथील कार्यक्रमात मंत्री‎ दादासाहेब भुसे यांच्या हस्ते विकास‎ मंचचे सदस्य किरण शिंदे, उमेश‎ पाटील, संदीप ठाकूर, घनश्याम‎ पाटील यांनी हा पुरस्कार‎ स्वीकारला.

मानपत्र, स्मृतिचिन्ह, ३०‎ हजार रुपयांचा धनादेश असे या‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ पुरस्काराचे स्वरूप आहे. हा‎ पुरस्कार वृक्ष, पाणी, वन संपदा,‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ जतन संवर्धन, महिला बाल‎ जनजागृती केल्याबद्दल‎ शासनाकडून दिला जातो. यंदा‎ अमळनेर तालुक्यातील पातोंडा‎ परिसर विकास मंचला हा पुरस्कार‎ मिळाल्याबद्दल मंचचे सर्वत्र काैतुक‎ हाेत आहे. या कामास कपिल पवार,‎ प्राचार्य मगन सूर्यवंशी, रावसाहेब‎ बोरसे, कन्हैया थोरात, विलास‎ चव्हाण तसेच पातोंडा‎ ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांसह‎ सरकारी अधिकारी, कर्मचारी व‎ ग्रामस्थांचे सहकार्य लाभले. पातोंडा‎ विकास मंचच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे‎ यानिमित्त सर्वत्र कौतुक होत आहे.‎ हा पुरस्कार स्वीकारताना मंचचे‎ पदाधिकारी उपस्थित हाेते.‎

बातम्या आणखी आहेत...