आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भूमिका:जुन्या पेन्शनसाठी उद्यापासून शासकीय कर्मचाऱ्यांचा संप‎

भडगाव‎13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जुनी पेन्शन योजना लागू करावी, या‎ प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी‎ राज्यातील सरकारी, निमसरकारी,‎ शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना‎ समन्वय समितीने दि.१४ पासून बेमुदत‎ संपाची हाक दिली आहे.‎ जुनी पेन्शन मागणी मंजूर‎ झाल्याशिवाय संप मागे घेतला जाणार‎ नाही, असा निर्णय सर्व संघटनांच्या‎ अंतिम आढावा बैठकीत घेतला आहे.‎ महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनने या‎ संपात सहभागी होण्याचा निर्णय घेतला‎ आहे, अशी माहिती संघटनचे‎ राज्यसंघटक संजय सोनार कळवाडीकर‎ यांनी दिली. १४ मार्च पासून संपाच्या‎ अंतिम तयारीसाठी सर्व कर्मचारी‎ संघटनांची अंतिम आढावा बैठक मुंबई‎ येथे, ४ मार्चला झाली. सर्व संघटनांनी‎ संपाच्या दृष्टीने आपली भूमिका मांडली.‎ केवळ जुनी पेन्शन या एकाच‎ मागणीसाठी संप केल्यास, जुने कर्मचारी‎ संपात सहभागी होण्याविषयी साशंकता‎ व्यक्त करण्यात आली.प रंतु जोपर्यंत‎ शासन जुनी पेन्शन या विषयावर चर्चा‎ करत नाही, तोपर्यंत संपातील इतर‎ मागण्यांविषयी समन्वय समिती चर्चा‎ करणार नाही, असे समितीचे निमंत्रक‎ विश्वास काटकर यांनी सांगितले.‎

बातम्या आणखी आहेत...