आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विज्ञान प्रदर्शन:तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्रियश वालदे याचे घवघवीत यश

शेंदुर्णीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात माध्यमिक गटात येथील डॉ. हेडगेवार शिक्षण प्रसारक मंडळ संचालित श्रीकृष्ण माध्यमिक विद्यालयाच्या प्रियश विलास वालदे या विद्यार्थ्याने प्रथम क्रमांक पटकावला अाहे. या विद्यार्थ्याने अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी पर्यावरणपूरक व कमी खर्चाचा सौर उर्जेचा वापर करून बहुपयोगी सोलर मायक्रोस्कोप (सौर सुक्ष्मदर्शी) तयार केला हाेता. विज्ञान, शिक्षण, आरोग्य क्षेत्रात याचा उपयोग केला जात असतो.

हे यश मिळवणाऱ्या प्रियश वालदे या विद्यार्थ्याचे संस्थेच्या अध्यक्षा डॉ. कौमुदी साने, सचिव कांतिलाल ललवाणी, संचालक डॉ. कल्पक साने, प्राचार्या शीलाबाई पाटील, मुख्याध्यापक राजेंद्र पाटील तसेच सर्व शिक्षकांनी काैतुक केले अाहे. प्रियश वालदे या विद्यार्थ्याला विज्ञान शिक्षक प्रमोद सरोदे व स्वप्निल शिसोदे यांचे मार्गदर्शन लाभले.

बातम्या आणखी आहेत...