आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिवादन:जयंतीनिमित्त महाराणा प्रताप यांना पाचोऱ्यात अभिवादन, व्याख्यान, आजी-माजी आमदार उपस्थित; समाजबांधवांसह नागरिकांचा प्रतिसाद

पाचोरा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील भडगाव रोडवरील महाराणा प्रताप चौकात आमदार किशोर पाटील व माजी आमदार दिलीप वाघ यांनी एकत्रित येवून महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी अनेक उपस्थितांच्या भुवया उंचावल्या होत्या, सद्यस्थितीत आजी-माजी आमदार अनेक कार्यक्रमांना सोबत उपस्थित राहत असल्यामुळे आघाडी धर्म पाळत असल्याचे दिसून येत आहे.

मात्र यामुळे दोन्ही पक्षांच्या पक्ष निष्ठ पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम निर्माण होताना पहावयास मिळत आहे. आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिकांच्या निवडणुकीत महाआघाडी करून निवडणुका लढवल्या जातात की वेगवेगळ्या निवडणुका लढवून पुन्हा आघाडी करावी लागेल, याविषयी तर्कवितर्क लढवले जात आहेत.

अभिवादन कार्यक्रमास नगरसेवक भूषण वाघ, सुनील पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी, समाज बांधव उपस्थित होते. याच दिवशी येथील शिवतीर्थ मैदानावर प्रा. सुनील पाटील यांचे महाराणा प्रताप यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकणारे व्याख्यान झाले. आमदार पाटील व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...