आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिमेचे पूजन:पारोळ्यातील टायगर स्कूलमध्ये संत‎ गाडगेबाबा यांना अभिवादन‎

पारोळा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील टायगर इंटरनॅशनल स्कूल येथे संत‎ गाडगेबाबा यांची पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात‎ आले. कार्यक्रमाला स्कूलचे प्राचार्य, सर्व शिक्षिका आणि‎ शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. प्रारंभी सर्व विद्यार्थ्यांनी‎ संत गाडगेबाबा यांना श्रद्धांजली अर्पण केली. विद्यार्थ्यांना‎ संत गाडगेबाबा यांच्या कार्याबद्दल माहिती देण्यात आली.‎ स्वच्छता ही आपल्या सर्वांसाठी किती आवश्यक आहे‎ याविषयी संत गाडगेबाबा यांचे विचार विद्यार्थ्यांना‎ सांगण्यात आले. संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला प्राचार्य‎ आणि शिक्षक वृंद यांनी पुष्पगुच्छ अर्पण केला.‎

बातम्या आणखी आहेत...