आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथील ६५ कोटींच्या पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन, आज दि.५ रोजी दुपारी ३ वाजता मंत्री गिरीश महाजन यांच्याहस्ते होणार आहे. या वेळी अन्य विकास कामाचे मंत्री महाजन यांच्या उपस्थितीत लाेकार्पण केले जाणार आहे. या योजनेसाठी नगराध्यक्षा विजया खलसे, उपनगराध्यक्ष गणेश पाटील, माजी उपनगराध्यक्ष नीलेश थोरात, भाजप जिल्हा उपाध्यक्ष गोविंद अग्रवाल व अमृत खलसे यांनी पाठपुरावा केला होता. केंद्र सरकारच्या अमृत दोन योजनेतून वाघूर धरणावरून शेंदुर्णीसाठी ६५ कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर झाली आहे.
त्याचे भूमिपूजन व कोनशीला अनावरण नगरपंचायतीत होणार आहे. भाजप तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर उपस्थित राहतील. त्याचप्रमाणे वाडी तलाव सुशोभीकरणाचेही भूमिपूजन होणार आहे. वाडी दरवाजा येथील ७१ लाखांच्या महिला व पुरुष स्वच्छतागृहाचा लोकार्पण, तसेच वाडी दरवाजा येथील हाळजवळ रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन, वाडी दरवाजा भागातील सोयगाव रोडवरील जलकुंभाचे लोकार्पण होणार आहे. तसेच जलशुद्धीकरण केंद्र तसेच पाणीपुरवठ्यासाठी सौर ऊर्जा प्रकल्पाचेही भूमिपूजन होणार आहे. उपस्थितीचे आवाहन सीओ साजिद पिंजारी यांनी केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.