आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:मल्हारगडावर सह्याद्री प्रतिष्ठानची गुढी; भगवी गुढी उभारून नववर्षाचे केले जोरदार स्वागत

चाळीसगाव4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंदू नववर्ष अर्थात गुढीपाडवा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक समजला जातो. शहरात विविध संघटनांकडून शोभायात्रा, सामूहिक गुढी अशा विविध कार्यक्रमाद्वारे गुढीपाडवा सण साजरा करण्यात आला. एकमेकांना नववर्षाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या मुहूर्तावर हिंदू नववर्ष गुढीपाडव्याच्या निमित्ताने येथील सह्याद्री प्रतिष्ठानच्या शिलेदारांनी सह्याद्रीच्या पर्वतरांगेतील चाळीसगाव जवळील कन्नड घाटात असलेल्या ऐतिहासिक मल्हार गडावर भगवी गुढी उभारून नववर्षाचे स्वागत केले. २ रोजी पहाटे सहा वाजता मल्हार गड येथे नववर्षातील उगवत्या सूर्याच्या साक्षीने सह्याद्री प्रतिष्ठान व येथील सायकल क्लबच्या सदस्यांनी हा सोहळा साजरा केला.

गडावर कायमस्वरूपी उभारण्यात आलेल्या ध्वज स्तंभावर भगवा ध्वज लावून पुष्पहार अर्पण करण्यात आला. गुलाल, भंडारा उधळून छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जयघोष करणाऱ्या घोषणा देत नववर्षाचे स्वागत करण्यात आले. सर्व सदस्यांनी एकमेकांना पेढे भरवून आनंद साजरा केला. यात सह्याद्री प्रतिष्ठानच्या असंख्य सदस्यांनी आपला सहभाग नोंदवला.

बातम्या आणखी आहेत...