आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘आनंदयात्री’चा उपक्रम:आमदार महाजनांच्या हस्ते गुढीचे पूजन; सचिन भावसार, सुनीता टिकारेंची उपस्थिती

जामनेर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ‘पाडवा पहाट’ने जामनेर येथील रसिक मंत्रमुग्ध

आनंदयात्री परिवार या संस्थेतर्फे मराठी नववर्षानिमित्त रविवारी ‘पाडवा पहाट’ या शास्त्रीय व सुगम संगीताच्या सुरेल कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी कलावंतांनी सादर केलेल्या भक्ती व भावगीतांनी रसिक मंत्रमुग्ध झाले.

जयपूर घराण्याचे शास्त्रीय व उपशास्त्रीय गायक पंडित सचिन भावसार (पुणे) व गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्या शिष्या सुनीता टिकारे (मुंबई) यांच्या भाव अन‌् भक्ती गीतांच्या शास्त्रीय मैफिलीचे आयोजन सोनबर्डीवरील अॅम्फी थिएटरमध्ये करण्यात आले होते. सोनेश्वर महादेव मंदिर अॅम्फी थिएटरचे या वेळी मुख्य अतिथी आमदार गिरीश महाजन व नगराध्यक्षा साधना महाजन यांच्या हस्ते गुढी उभारून व श्रीफळ वाढवून उद‌्घाटन करण्यात आले. कार्यक्रमास तहसीलदार अरुण शेवाळे, पालिकेचे मुख्याधिकारी चंद्रकांत भोसले यांची उपस्थिती होती. मैफलीला वाद्यवृंदात तबल्याची तेजस मराठे, हार्मोनियमवर जितेश मराठे, पखवाज वर भूषण गुरव, ताल उमेश चौधरी, तानपुऱ्याने कुंदन तायडे यांनी साथसंगत केली. सूत्रसंचालन गणेश राऊत तर डॉ. चंद्रशेखर पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमास आनंदयात्रीचे अध्यक्ष डॉ. अमोल सेठ, सचिव सुहास चौधरी, कोषाध्यक्ष डॉ. आशिष महाजन, डॉ. राजेश सोनवणे, डॉ. पराग पाटील, नितीन पाटील, सुधीर साठे, कडू माळी, अमरीश चौधरी, बंडू जोशी, सनी डांगी यांनी सहकार्य केले.

एम्फी थिएटरचा पहिलाच कार्यक्रम
तत्कालीन मंत्री तथा आमदार गिरीश महाजन यांनी सोनबर्डी येथे सोनेश्वर महादेव मंदिरासह धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी भव्य असे एम्फी थिएटर बांधले आहे. या थिएटरचे काम गेल्या तीन वर्षांपूर्वीच पूर्ण झाले आहे. मात्र, कोविडसह अन्य कारणांनी या एम्फी थिएटरचे लोकार्पण राहिले होते. रविवारी आमदार गिरीश महाजन यांच्या हस्ते या एम्फी थिएटरच्या लोकार्पणानंतर आनंदयात्री परिवारातर्फे आयोजित पाडवा पहाट हा पहिलाच कार्यक्रम झाला.

बातम्या आणखी आहेत...