आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आगळावेगळा कार्यक्रम:पांडववाडा मित्र मंडळातर्फे अवयवदानाबाबत मार्गदर्शन

एरंडोलएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

देहदान, अवयवदान व हृदयराेग या विषयावर मार्गदर्शनाचा आगळावेगळा कार्यक्रम पांडव वाडा मित्र मंडळातर्फे ६ रोजी घेण्यात आला. या कार्यक्रमात डॉ. नरेंद्र ठाकूर यांनी अवयव, देहदान या विषयी तांत्रिक व कायदेशीर माहिती दिली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार सुचिता चव्हाण होत्या. सकाळच्या सत्रात जळगाव येथील हृदयरोग तज्ज्ञ डॉ. संदीप भारूडे यांच्या मार्फत हृदयरोग तपासणी, इसीजी, लुपीड प्रोफाइल, एचबी-१सी आदी तपासण्या करण्यात आल्या.

जवळपास ६५ रुग्णांनी याचा लाभ घेतला. प्रमुख अतिथी म्हणून पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव, मुख्याधिकारी विकास नवाळे, डॉ. सुधीर काबरा, डॉ. उज्ज्वला राठी, डॉ. फरहाज बोहरी, डॉ. राहुल वाघ, डॉ. अमोल बोरणारकर, माजी नगराध्यक्ष रमेश परदेशी हजर होते. कार्यक्रमास रमेश महाजन, देविदास महाजन, जी. आर. महाजन, डॉ. किरण पाटील, जगदीश ठाकूर, डॉ. सुरेश पाटील, शालिग्राम गायकवाड, उत्तमराव पाटील, डॉ. शेखर पाटील, गणेश वाणी आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमास तुषार मोने, उदय पाटील, दीपक चौधरी, प्रशांत चौधरी, सागर चौधरी, विनायक मोरे, जगदीश मोरे, केवल ठक्कर, धर्मेश मराठे, श्रीपाद मैराळ यांनी सहकार्य केले. सूत्रसंचालन रोहित पाटील व प्रथमेश मोने यांनी, प्रास्तविक अॅड. विलास मोरे तर दिलीप पांडे यांनी आभार मानले.

बातम्या आणखी आहेत...