आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काेराेना प्रतिबंधक लसीकरण:राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत धरणगावात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

धरणगाव6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील महात्मा फुले हायस्कूलमध्ये २९ जुलै रोजी काेराेना प्रतिबंधक लसीकरण शिबिर घेण्यात आले. याप्रसंगी शाळेतील सातवी ते दहावीच्या मुला, मुलींचे लसीकरण करण्यात आले.याप्रसंगी डॉ. मयूर जैन, आरोग्य सहाय्यक रियाज देशमुख, डाटा एन्ट्री ऑपरेटर यश ब्राह्मणे, औषध निर्माता दिनेश बडगुजर, रेखा सोनवणे, समुपदेशक गणेश कुंभार व पथकातील सर्व कर्मचाऱ्यांची उपस्थिती हाेती. सर्व मान्यवरांचे मुख्याध्यापक जे. एस. पवार यांनी स्वागत केले. राष्ट्रीय आरोग्य अभियान व राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत ग्रामीण रुग्णालयातील समुपदेशक गणेश कुंभार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी पर्यवेक्षक एम. बी. मोरे, पी. आर. सोनवणे, एम. के. कापडणे, एस. व्ही. आढावे, पी. डी. पाटील, एस. एन. कोळी, एच. डी. माळी, सी. एम. भोळे, व्ही. टी. माळी, व्ही. पी. वऱ्हाडे, एम. जे. महाजन उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...