आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ईडीची भीती:गुलाबराव ईडीच्या भीतीपोटीच शिंदे गटात

धरणगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील हे ईडीची भीती, सत्तेच्या लालसेपोटी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसून शिंदे गटात सहभागी झाले. राज्याचा पाणीपुरवठा मंत्री असलेली व्यक्ती आपल्या गावाला पाणी देऊ शकत नाही. प्रत्येक टेंडरवर टक्केवारी घेतल्याशिवाय काम देत नाही, असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला. धरणगाव येथील सभेत त्या बोलत होत्या.

धरणगाव येथे महाप्रबोधन यात्रेत दुसऱ्या टप्प्याची जाहीर सभा मंगळवारी रात्री झाली. त्यात राष्ट्रवादीचे गुलाबराव देवकर यांनी, आम्ही महाविकास आघाडीचा धर्म पाळण्यासाठी सभेला आल्याचे सांगितले. युवा सेनेचे शरद कोळी यांनीही भाषण केले. संपर्कप्रमुख संजय सावंत, ठाणे येथील जनार्दन पाटील, जळगावच्या महापौर जयश्री महाजन, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, महानगरप्रमुख शरद तायडे, सुनील महाजन, महानंदा पाटील, सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, जानकीराम पाटील, गजानन मालपुरे, नीलेश चौधरी, राष्ट्रवादीचे ज्ञानेश्वर महाजन, पुष्पा महाजन आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...