आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराजस्थानातून चाळीसगावमार्गे मुंबई कडे जात असलेला, ९२ लाखांचा गुटखा भरलेला कंटेनर चाळीसगाव शहर पोलिसांनी ३० रोजी सायंकाळी ५ वाजता पकडला. शहरातील मालेगावरोड बायपासजवळ झालेल्या कारवाईत पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले.
मुंबईकडे गुटखा घेऊन कंटेनर जात असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली होती. पोलिस निरीक्षक के.के. पाटील, सहाय्यक निरीक्षक विशाल टकले, सागर ढिकले, विनोद भोई, राकेश पाटील, पवन पाटील यांनी शिताफीने कंटेनतर ताब्यात घेतला. कंटनेरमध्ये ५ एसएचके कंपनीचा १५१ पोते गुटखा आढळला. याप्रकरणी कंटेनरसह पोलिसांनी गुटख्याचा मुद्देमाल ताब्यात घेतला. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. यापूर्वी देखील चाळीसगाव ग्रामीण पोलीसांनी लाखो रूपयांचे गुटख्याचे कंटेनर पकडले आहेत. विषेश म्हणजे यापुर्वी पोलिसांनी पकडलेले कंटनेरही राजस्थान येथून चाळीसगावमार्गे मुंबईकडे गुटखा घेऊन जात होते. त्यामुळे गुटखा तस्करांनी राजस्थानहून मंुबईत गुटखा पाठवण्यासाठी चाळीसगावचा मार्ग निवडला. वारंवार कारवाईत गुटखा पकडला जातो, तरीही तस्करांच्या हालचाली थांबत नसल्याचे चित्र आहे. चाळीसगाव ग्रामीण पोलीसांपाठोपाठ चाळीसगाव शहर पोलिसांनी कारवाई केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.