आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजळगाव ते औरंगाबाद महामार्गावरील वाकोदजवळ २ रोजी साडेपाच वाजेदरम्यान संशयित बोलेरो पिकअप गाडी आढळली हाेती. या प्रकरणी तब्बल २४ तासानंतर पोलिसांनी गाडी चालक व गाडी मालकावर गुन्हा दाखल केला आहे. या गाडीतून तब्बल १४ लाख ६० हजारांचा अवैध गुटख्यासह मुद्देमाल जप्त केला आहे.
या प्रकरणी पहूर पोलिस ठाण्यात ईश्वर देशमुख यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.यात गाडीत ७ लाख ६८ हजारांचा गुटखा तर १ लाख ९२ हजारांची जर्दा व ५ लाखांची बोलेरो पिकअप गाडी असा १४ लाख ६० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला अाहे. यामागे मोठे रॅकेट असण्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान, जळगाव ते औरंगाबाद महामार्गावर वाहतूक पोलिसांच्या तपासणी दरम्यान मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजता पिंपळगाव, पळासखेडा फाट्याजवळ जळगाव वाहतूक पोलिसांनी बोलेरो (एमएच- १९ सीवाय- ६८८१) अडवली. चौकशीत चालक संशयास्पद वागणूक करत हाेता. गाडीत काय आहे, असे विचारताच वाहन चालकाने तेथून धूम ठोकण्याचा प्रयत्न केला.
त्याचा पाठलाग करत वाहतूक पोलिस ही गाडीमागे निघाले. चालकाने यू-टर्न घेऊन महामार्गावर गाडी लावून शेतातून पळ काढला. दरम्यान, प्रारंभी ट्रॅफिक पोलिसांनी गाडीत चटई असल्याचे पत्रकारांना सांगितले. त्यानंतर पहूरचे पोलिस घटनास्थळी हजर झाले असता जागेवर पंचनामा करा, अशी मागणी पत्रकारांनी केली. परंतु, गाडी पोलिस ठाण्यात घेऊन जावी लागेल, असे सांगण्यात आले. यामुळे गाडीत नेमके काय आहे, अशी सर्वांना शंका येत होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.