आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई‎:तारखेडला 27 लाख‎ रुपयांचा

पाचोरा‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील तारखेडा येथे एका‎ गोदामात अवैधरीत्या गुटख्याचा‎ साठा असल्याची गुप्त माहिती‎ चाळीसगावचे सहाय्यक पोलिस‎ अधीक्षक अभयसिंग देशमुख‎ यांना मिळाली हाेती. त्यानुसार‎ एक पथक तयार करुन पथकाने‎ तारखेडा येथील गोदामात छापा‎ घालून तब्बल २६ लाख ८६‎ हजार ३६८ रुपयांचा अवैधरीत्या‎ गुटखा जप्त करुन एकास‎ पकडले आहे.

या प्रकरणात दोन‎ जण फरार झाले आहेत.‎ सहाय्यक पोलिस अधीक्षक‎ अभयसिंग देशमुख यांच्या‎ मार्गदर्शनात पोलिस काॅन्स्टेबल‎ अजय पाटील, महेश बागुल,‎ पोलिस नाईक राजेंद्र निकम‎ यांच्या पथकाने २ फेब्रुवारीला‎ रात्री ८ वाजता तारखेडा गाठले.‎ या पथकाला एका गोदामासमोर‎ अनिल काशिनाथ वाणी (रा.‎ तारखेडा) बसलेला दिसला.‎ पथकाने गाेदामाची तपासणी‎ केली असता गाेदामात मोठ्या‎ प्रमाणात गुटखा मिळाला. तर‎ अनिल वाणी याने हा माल‎ दिलीप एकनाथ वाणी व गोकुळ‎ एकनाथ वाणी यांचा असून मी‎ केवळ विक्री करत असल्याचे‎ सांगितले.

त्यानंतर पाचोरा येथील‎ पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे,‎ योगेश गणगे, सहाय्यक फौजदार‎ प्रकाश पाटील व पोलिस नाईक‎ नरेंद्र नरवाडे हे घटनास्थळी‎ दाखल झाले. पोउनि जितेंद्र वल्टे‎ यांनी घटनास्थळाचा पंचनामा‎ करून गुटख्याच्या साठ्यासह‎ अनिल वाणी यास ताब्यात‎ घेतले. जप्त केलेल्या मालात १८‎ लाख ६७ हजारांचा विमल पान‎ मसाल्याचे ४८ पोते, व्ही. १‎ टोबॅको नावाच्या तंबाखूच्या ९‎ गोण्या, ४ लाख ९९ हजार २००‎ रुपयाचे राज निवास सुगंधित‎ पान मसाल्याचे १३ पोते, २ लाख‎ ५४ हजार १०० रुपयांची व्ही. १‎ टोबॅको नावाच्या तंबाखूच्या ७‎ गोण्या, ५६ हजार १६० रुपयांचे‎ सागर पान मसाल्याचे २ पोते‎ प्रत्येक असा एकुण २६ लाख ८६‎ हजार ३८६ रुपयांचा अवैध साठा‎ सापडला. या प्रकरणी पाचोरा‎ पोलिसांत गुन्हा नोंदवला अाहे.‎ अनिल वाणी यांना पोलिसांनी‎ ताब्यात घेतले आहे. अद्याप‎

बातम्या आणखी आहेत...