आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्साह:पाराेळा शाळेत रंगला‎ हळदीकुंकू कार्यक्रम‎

पारोळा‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील जिल्हा परिषदेच्या उच्च‎ प्राथमिक शाळा क्रमांक दाेनमध्ये‎ माता पालक मेळावा व हळदी कुंकू‎ कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात‎ आला.‎ या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी‎ गटशिक्षणाधिकारी संजय पवार तर‎ प्रमुख अतिथी म्हणून शालेय षोषण‎ आहार अधीक्षक सी. एम. चौधरी,‎ कविता सुर्वे यांची उपस्थिती हाेती.‎ प्रारंभी मान्यवरांनी दीपप्रज्वलन‎ केले.

त्यानंतर मुख्याध्यापक रवींद्र‎ पाटील यांनी प्रास्ताविक केले. या‎ वेळी उपस्थित मान्यवरांनी मनाेगत‎ व्यक्त केले. तर जळगाव जिल्हा‎ अपंग कर्मचारी पतसंस्थेच्या‎ चेअरमनपदी बिनविरोध निवड‎ झाल्याबद्दल रवींद्र लोटन पाटील‎ यांचा शाळेतर्फे सत्कार करण्यात‎ आला. हुतात्मा दिनानिमित्त या वेळी‎ विद्यार्थ्यांनी देश प्रेमावर आधारित‎ नृत्य गीते सादर केली. त्यानंतर सर्व‎ मातांना हळदी कुंकू व भेटवस्तू‎ देण्यात आल्या. सूत्रसंचालन‎ विशाल शिंपी यांनी केले.‎ कार्यक्रमास किशोर पाटील, कल्पना‎ मोरे, नीता क्षत्रिय, दीपाली बुवा यांनी‎ सहकार्य केले.‎

बातम्या आणखी आहेत...