आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतिक्रम:फत्तेपुरात पोलिस बंदोबस्तात अतिक्रमणांवर प्रथमच हातोडा

जामनेर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

फत्तेपूर येथील अतिक्रमणांवर ग्रामपंचायतीने प्रथमच पोलिस बंदोबस्तात हातोडा चालवला. यामुळे काही नागरिकांनी वाद घातला तर बहुतांश नागरिकांनी स्वत:हून अतिक्रमण काढून घेतले. त्यामुळे गावातील काही रस्त्यांनी अनेक वर्षांनी मोकळा श्वास घेतला.

गेल्या अनेक वर्षांपासून गावातील नागरिकांनी थोडेथोडे करून रस्त्यांवर अतिक्रमण केले होते. अनेक रस्ते वापरायोग्य राहिले नसल्याने तक्रारी वाढल्या होत्या. नागरिकांच्या तक्रारी पाहता ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत अतिक्रमण काढण्याचा एकमताने ठराव घेण्यात आला होता. त्यानुसार शनिवारी पोलिस बंदोबस्त घेऊन मुस्लीम मोहल्ला, कुंभार गल्ली, पाण्याच्या टाकीजवळ, सुरेशभाऊ नगर, डॉ. अरूण फिरके यांच्या रुग्णालयाकडून टाकळी रोडकडे जाणाऱ्या रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यात आले. या वेळी काही ठिकाणी नागरिकांनी पदाधिकाऱ्यांशी किरकोळ वाद घातला. मात्र, अनेक नागरिकांनी स्वत:हून अतिक्रमण काढल्याने फत्तेपूरातील रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला. अतिक्रमण काढताना पंचायत समिती सदस्य एकनाथ लोखंडे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी सुरेश पाटील उपस्थित होते. पहूर पोलिस ठाण्याच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक बनसोडे यांच्यासह १५ कर्मचाऱ्यांनी चाेख बंदोबस्त ठेवला.

प्रथमच कारवाई : गावकीचे राजकारण व मतांची बेरीज पाहता आतापर्यंत कुठल्याही पदाधिकाऱ्यांनी अतिक्रमण काढण्याचा विषयाला हात घातला नव्हता. यामुळे मात्र अतिक्रमण करणाऱ्यांना अप्रत्यक्ष पाठबळच मिळून मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण वाढले होते. तसेच वाढत्या तक्रारी पाहता सरपंच पुष्पाबाई पुना शेजुळे यांनी हिंमत दाखवून अतिक्रमण काढण्याचा निर्णय घेतला.

बातम्या आणखी आहेत...