आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हातभट्ट्या:बाणगाव, सांगवी भागातील हातभट्ट्या केल्या उद‌्ध्वस्त ; ग्रामीण पोलिसांनी कारवाईचा बडगा

चाळीसगाव17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्रामीण पोलिस ठाणे हद्दीतील सांगवी, बाणगाव व खेरडे आदी भागात बिनधास्त सुरू असलेल्या हातभट्ट्यांवर चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारत ६५ हजार ८०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करून तो जागीच नष्ट केला. या कारवाईत मद्य तयार करणारे मात्र फरार झाले असून पोलिसांकडून त्यांचा शोध घेतला जात आहे. चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजय ठेंगे, उपनिरीक्षक लोकेश पवार, पोलिस नाईक शांताराम पवार, देविदास पाटील, भूपेश वंजारी, ज्ञानेश्वर बडगुजर, प्रेमसिंग राठोड यांच्या पथकाने १२ रोजी पोलिस ठाणे हद्दीतील सांगवी, बाणगाव व खेरडे या ठिकाणच्या अवैध हातभट्ट्यांवर धाडी टाकल्या. या वेळी पोलिसांनी ५६ हजार रूपये किंमतीची १४ लिटर दारू तयार करण्यासाठी लागणारे कच्चे रसायन, ९ हजार ८०० रूपये किंमतीचे १४ ड्रम असा ६५ हजार ८०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करून तो जागीच नष्ट केला.

बातम्या आणखी आहेत...