आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इशारा:जामनेरात हातगाडी, बेशिस्त पार्किंगमुळे वाहतूक कोंडी; न.पा, पोलिस प्रशासनातर्फे सक्त ताकीद

जामनेर10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील मुख्य रस्त्यांवर हातगाडीधारक व त्यांच्या ग्राहकांकडून होणारी वाहनांची बेशिस्त पार्किंग पाहता वारंवार वाहतुकीची कोंडी होते. त्यामुळे शुक्रवारी नगरपरिषदेसह पोलिस प्रशासनाने संयुक्त मोहीम राबवून हातगाडीधारकांना सक्त ताकीद दिली. तर पोलिस प्रशासनातर्फे अनेक वाहनांवर ‘नो पार्किंग’च्या केसेसही करण्यात आल्या.

शहरातील मुख्य रस्त्यांच्या दुतर्फा हातगाडी धारकांनी अतिक्रमण केले आहे. समोर हातगाड्या व त्यामागे बसण्यासाठी बाक टाकल्याने निम्मे अधिक रस्ता या हातगाड्यांनी व्यापतो. हातगाडी धारकांकडे येणारे ग्राहक आपल्या मोटारसायकली, अन्य वाहने रस्त्यात लावतात.

त्यामुळे शहरात वाहतुकीची वारंवार कोंडी होते. याबाबत वाढत्या तक्रारींमुळे शुक्रवारी नगर परिषदेने पोलिसांची मदत घेऊन हातगाडी धारकांना रस्त्याच्या अंतिम कडेला गाडी लावण्याची सक्त ताकीद दिली.

बातम्या आणखी आहेत...