आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चर्चा:एरंडाेल पालिकेच्या आढावा बैठकीत हर घर तिरंगा अभियानाबाबत चर्चा

एरंडोल9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील नगरपालिका सभागृहात ‘हर घर तिरंगा’ अभियान राबवण्याबाबत शहरातील गणेश मंडळ, सामाजिक संस्था, विविध राजकिय पक्षांचे पदाधिकारी, महिला मंडळ, व्यापारी असोसिएशन, डॉक्टर्स, उद्योजक यांची आढावा बैठक घेण्यात आली.

आढावा बैठकीस मुख्याधिकारी तथा प्रशासक विकास नवाळे, रमेशसिंग परदेशी, जयश्री पाटील, नरेंद्र पाटील, प्रसाद दंडवते, नरेश डागा, भास्कर जोगी, विवेक ठाकूर, गणेश महाजन, संजय चौधरी, माजी नगरसेवक जहिरोद्दीन कासम, रवींद्र महाजन, अशोक चौधरी, शिवाजी अहिरराव, शालिग्राम गायकवाड, जावेद मुजावर, ओम पाटील, ज्ञानेश्वर महाजन, कैलास महाजन, कार्यालय अधीक्षक हितेश जोगी. डॉ. अजित भट, देवेंद्र शिंदे, डॉ. योगेश सुकटे आदींसह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. एरंडोल पालिकेतर्फे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘हर घर तिरंगा’ हा उपक्रम १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत राबवला जाणार आहे.

त्यानिमित्त शहरातील प्रत्येक घरावर तसेच शासकीय व निमशासकीय, खासगी आस्थापना, सहकारी संस्था, शैक्षणिक संस्था यांच्या इमारतीवर राष्ट्रध्वजाची स्वयंस्फूर्तीने उभारणी करण्यासाठी प्रशासक विकास नवाळे यांनी आवाहन केले. एरंडोल पालिका मार्फत ९ ते १७ ऑगस्टदरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. त्यात शहरातील सर्व शाळा, सामाजिक, राजकीय, व्यापारी संस्थांचे सहकार्य घेऊन भव्य रॅलीचे काढण्यात येणार आहे. तसेच वृक्षारोपण, स्वच्छता मोहिम, सांस्कृतिक कार्यक्रम, महिला बचत मेळावा तसेच चित्रकला, निबंध, वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन केले जाणार आहे. दरम्यान, एरंडाेल शहरात हर घर तिरंगा फडकवण्यासाठी पालिकेतर्फे तिरंगा स्टॉल लावण्यात येणार आहे. या स्टॉलवर सशुल्क शहरातील नागरिकांनी तिरंगा खरेदी करण्याचे या वेळी आवाहन करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...