आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबनावट नोटा चलनात आणणारा हिंगणे बुद्रुक येथील तरूण पहूर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. यू-ट्यूबवर पाहून कल्पना सुचल्याने ऑनलाइन प्रिंटर मागवून घरी नोटा प्रिंट करत असल्याचा प्रकार प्राथमिक तपासातून समोर आला आहे. हिंगणे येथील उमेश चुडामन राजपूत हा २२ वर्षीय तरूण दहावी नापास आहे. जवळीलच एका खासगी कंपनीत तो कामाला जातो मोबाइलमध्ये यू-ट्यूबवर नोटा कशा तयार कराव्यात, याबाबतचा व्हिडिओ पाहून त्याला बनावट नोटा तयार करण्याची कल्पना सुचली. त्याने ऑनलाइन प्रिंटर व नोटांसाठी वापरल्या जाणाऱ्या कागदासारखा कागद विकत आणला. त्यानंतर उमेश राजपूत हा मागील सात महिन्यांपासून घरातच झेरॉक्स मशिनच्या सहाय्याने दोनशे रुपयांच्या बनावट नोटा तयार करायचा. त्यानंतर या बनावट नाेटा तालुक्यातील पहूर, जामनेर व नेरी येथील आठवडे बाजारात चालवत असल्याचे त्याने पोलिसांनी सांगितले. यू-ट्यूबवर पाहून कल्पना सुचल्याने ऑनलाइन प्रिंटर मागवून घरी नोटा प्रिंट करत असल्याचा प्रकार प्राथमिक तपासातून समोर आला आहे. असे उघडले बिंग : उमेश राजपूत पहूर येथील आशीर्वाद हॉटेलमध्ये पाण्याची बाटली घेण्यासाठी गेला. हॉटेल मालक श्रीकृष्ण लोहारे यांना त्याने २०० रूपयांची नोट दिली. लोहारे यांनी ही नोट बनावट असल्याचे सांगितले. यावर लागलीच उमेशने दुसरी नोट देऊन पळ काढला. परंतु श्रीकृष्ण लोहारे यांना संशय आल्याने त्यांनी त्याचा पाठलाग करुन त्याला पहूर पोलिसांच्या स्वाधीन केले. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दाखवले प्रात्यक्षिक पाचोरा विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी भारत काकडे यांनी पहूर पोलिस ठाण्यात भेट दिली असता उमेश राजपूतने नोटा तयार करण्याचे प्रात्यक्षिक करून दाखवले. या नोटा पहूरल जामनेर व नेरीच्या आठवडे बाजारात चालवत असल्याचे त्याने सांगितले. आखतवाडे येथील तरुणाचा विहिरीत पडल्याने मृत्यू तपास पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांच्या मार्गदर्शनात पोलिस नाईक अमोल पाटील करत आहे. मृत रवींद्र गढरी यांच्या पश्चात वृद्ध आई, वडिल, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, दोन भाऊ असा परिवार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.