आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रब्बीला मिळेल लाभ:फत्तेपूर परिसरात तासभर जोरदार पावसाची हजेरी

जामनेर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यात फत्तेपूरसह परिसरात बुधवारी दुपारी तासभर दमदार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे शेंगोळा यात्रोत्सवातील व्यावसायिकांची चांगलीच धावपळ झाली. कपाशी, गहू, हरभरा या पिकांसाठी हा पाऊस काहीसा लाभदायक असल्याचे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले.गेल्या तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण होते. बुधवारी दुपारी चार वाजेदरम्यान फत्तेपूरसह तोंडापूर, वाकडी, फर्दापूर या भागात दमदार पाऊस झाला.

कोरोनामुळे तीन वर्षांपासून बंद असलेल्या शेंगोळा यात्रेत यंदा चांगलीच गर्दी होती. बुधवारी पडलेल्या पावसामुळे यात्रेकरूंसह व्यावसाईकांची तारांबळ झाली. यात्रेत आलेल्या नागरिकांनीदेखील पावसापासून बचावासाठी दुकानांचा आसरा घेतला. फत्तेपूरसह परिसरात पाऊस झाला असला तरी जामनेर शहरात मात्र दिवसभर फक्त ढगाळ वातावरण होते. तर जामनेर शहरात रात्री आठ वाजेदरम्यान १० मिनिटे पावसाच्या सरी कोसळल्या. पावसानंतर वातावरणात गारठा वाढला होता. पावसामुळे शेंगोळा यात्रोत्सवावर परिणाम झाला.

बातम्या आणखी आहेत...