आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावसामुळे अनेकांची तारांबळ:मुसळधार पावसाची चोपडा शहरात हजेरी

चोपडा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

चोपडा शहर आणि तालुक्यात अनेक ठिकाणी १७ रोजी अवकाळी पावसाने हजेरी लावली. चोपडा शहरात अचानक आलेल्या पावसामुळे अनेकांची तारांबळ उडाली. व्यावसायिकांना अचानक आलेला पावसामुळे आपली दुकान आवरताना माेठा त्रास सहन करावा लागला.चोपडा शहरात जवळपास २० मिनिटे दमदार पावसाने हजेरी लावली. विजांच्या कडकडाटासह झालेल्या आजच्या पावसामुळे शहरात रात्री उशिरापर्यंत गारवा निर्माण झाला होता.

या पावसाचा शेती पिकांना लाभ होणार आहे. तर या पावसामुळे चोपडा शहरासह परिसरात काेठेही शेती पिकांचे नुकसान झालेले नाही. शहरातील जिनिंगमध्ये रस्त्यावर पडलेला कापूस आवरताना जिनिंग मालकाचे देखील तारांबळ उडाली. तर पंकज नगर, बोरोले नगर परिसरातील गटारी वरून पाणी वाहून निघाले. शहरातील अनेक ठिकाणी लग्न सोहळे असून अचानक आलेल्या पावसामुळे लग्नाचे आयाेजन करणाऱ्यांची ही मोठी फजिती झाली.

बातम्या आणखी आहेत...