आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापलिकेने हॉटेल दयानंद कॉर्नर जवळील रस्त्याचे क्रॉँकिटीकरण हाती घेतले आहे. त्यासाठी या रस्त्यावरील वाहतूक ३० दिवसांसाठी बंद केली आहे. तर कन्नड व नागद रोडवरील वाहतूक रिंगरोडवरील चामुंडा माता मंदिराजवळील पुलावरून वळवली आहे. मात्र चामुंडा माता मंदिराजवळील पुलाची अवस्था जीर्ण झाली आहे. शिवाय या पुलास कठडेही नाहीत. सध्या वाळूचे डंपर व इतर अवजड वाहने याच पुलावरून जात आहेत. त्यामुळे धोका निर्माण झाला आहे.
मेजर कॉर्नर जवळील रस्त्याचे क्रॉँकिटीकरण सुरू करण्यापुर्वी या पुलाची डागडुजी होणे गरजेचे होते. मात्र, पालिका प्रशासनाने खबरदारी घेतली नाही. जीर्णावस्थेतील पुलाचे काँक्रीट ठिकठिकाणी निघाले असून, गजदेखील बाहेर आले आहेत. तसेच पुलावर जागोजागी खड्डे पडले आहेत. पुलास दोन्ही बाजूने कठडे नसल्याने हा पूल धोकादायक आहे. पालिकेने वाहतूक वळवताना कोणतेही दिशादर्शक फलक लावलेले नाहीत. त्यामुळे बाहेरगावाहून येणाऱ्या नवख्या वाहनधारकांना रात्रीच्या वेळी रस्ता सापडत नाही.
बाजार समितीला जोडणारा महत्त्वाचा मार्ग तिरंगा पूल ते संपूर्ण नागद रोड चौफुलीपर्यंत रस्त्यालगत रहिवासी भाग असल्याने, तेथील नागरिकांनादेखील पुलावरील वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागतो. राष्ट्रीय महामार्ग ७५३ ला जोडणारा हा पूल असून, या पुलावरून बाजार समितीत येणारे शेतकऱ्यांना आपला माल घेऊन जावा लागतो. यासंदर्भात रयत सेनेचे संजय कापसे यांनी पलिकेला निवेदन दिले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.