आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्घृण खून:धरणगावात थर्टीफर्स्टच्या रात्री तरुणाचा निर्घृण खून

धरणगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील कृष्णा जिनिंगमध्ये थर्टी फर्स्टच्या रात्री किरकोळ वादातून एका ३० वर्षीय तरुणाचा निर्घृण खून झाल्याची घटना उघडकीस आली. शिरपूर तालुक्यातील दहिवद तांडा येथील कालू सोनवणे (वय ३०) असे मृत तरुणाचे नाव आहे.

शहरातील कृष्णा जिनिंगमध्ये काही बाहेर जिल्ह्यासह राज्यातील मजूर काम करतात. ३१ डिसेंबरला रात्री ९ वाजेच्या सुमारास कालू सोनवणे यांचा जिनिंगमधील काही बिहार प्रदेशातील मजुरांसोबत किरकोळ विषयातून वाद झाला. थोड्याच वेळात वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. साधारण १५ ते १७ जणांनी हल्ला चढवल्यामुळे कालू साेनवणे हतबल झाला.

तेवढ्यात एकाने कालूच्या डोक्यात लाकडी दांडा टाकला. यात तो जागीच कोसळला. यानंतर सर्व संशयित आरोपी जिनिंग सोडून फरार झाले. तर कालू साेनवणे यांना धरणगाव ग्रामीण रुग्णालयात आणल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. यानंतर स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपींच्या शोधार्थ वेगवेगळ्या भागात पथक रवाना केली. अनोरे, धानोरे, गारखेडा या भागातील जंगलांमध्ये रात्रभर पोलिसांनी संशयित आरोपींचा शोध घेतला.

यांनी राबवली शाेधमाेहीम
पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक जिभाऊ पाटील, पोलिस उपनिरीक्षक अमोल गुंजाळ, हेड कॉन्स्टेबल विनोद संदानशिव, मिलिंद सोनार, पोलिस हवालदार संजय सूर्यवंशी, समाधान भागवत, प्रमोद पाटील, मनोज पाटील, महेश देवरे, स्थानिक गुन्हे शाखेचे जितेंद्र पाटील, महेश पाटील यांच्या पथकाने रात्रभर जंगलात शोध घेऊन १० संशयितांना ताब्यात घेतले.

बातम्या आणखी आहेत...