आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तहसीलदारांना निवेदन:कोर्ट दाखल्याविना वारस नोंद करू नये

धरणगाव5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोर्टाच्या वारस दाखविल्याशिवाय वारसाची नोंद करु नये, असे निवेदन ७ रोजी धरणगांव वकील संघाने तहसीलदारांना दिले. मृत व्यक्तीचे कायदेशीर वारस म्हणून नोंद करण्यासाठी वारसदार हे तलाठी व मंडळाधिकारी यांच्याकडे जातात. ते परस्पर केवळ १०० रुपयांच्या मुद्रांकावर लिहिलेला मजकुर दस्त म्हणून स्विकारुन वारसांची नोंद करुन घेतात. अशी नोंद करणे बेकायदेशीर आहे.

बॉम्बे रेग्युलेशन अॅक्ट, १८२७ अन्वये वारसांची नोंद करण्यासाठी न्यायालयाकडून वारस प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे. नायब तहसिलदार लक्ष्मण सातपुते यांनी ते स्विकारले. वकील संघाचे अध्यक्ष अॅड.आर.एस.पाटील, उपाध्यक्ष कैलास मराठे, सचिव अॅड.गजानन पाटील, अॅड. व्ही. एस. भोलाणे, अॅड. राहूल पारेख, अॅड. बी. के. आवारे आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...