आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील राजवड आदर्श गावाच्या पुष्पलता नीळकंठ पाटील यांनी गावातील महिलांसाठी ओम भगिनी महिला बचत गट व ओम महिला शेतकरी गट स्थापन करून महिलांना स्वावलंबी बनवण्याचे कार्य केले आहे. त्यांनी आजवर केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत त्यांना जागतिक महिला दिनानिमित्त मराठा सेवा संघ प्रणित संत गाडगे महाराज प्रबोधन परिषदेतर्फे महिला रत्न पुरस्कार प्रदान केला. धुळे येथे नुकताच नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांच्या हस्ते पुष्पलता पाटील यांना गाैरवण्यात आले.
हा पुरस्कार वितरण सोहळा नैसर्गिक मानवाधिकार सुरक्षा परिषद फोरमचे नॅशनल डायरेक्टर जनरल गोरख देवरे, मराठा सेवा संघ प्रणित संत गाडगे महाराज प्रबोधन परिषदेच्या प्रदेशाध्यक्षा प्रा. वैशाली पाटील, फोरमचे ॲडिशनल स्टेट डायरेक्टर प्रमोद पाटील तसेच प्रा. मंदाकिनी भामरे यांच्या उपस्थित पार पडला. याबद्दल कृषिभूषण साहेबराव पाटील, जिजामाता कृषी भूषण पुष्पलता पाटील तसेच राजवड ग्रामस्थांनी पुष्पलता पाटील यांचे कौतुक केले आहे. त्या राजवड येथील आदर्श शेतकरी नीळकंठ दगडू पाटील यांच्या पत्नी आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.