आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्कार:मारवड पोलिस ठाण्यात महिला‎ पोलिस कर्मचाऱ्यांचा सन्मान‎

पाडळसरे‎16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जागतिक महिला दिनानिमित्त‎ आयोजित कार्यक्रमात अमळनेर व‎ मारवड पोलिस ठाण्याच्या महिला‎ कर्मचाऱ्यांनी सहभाग घेत प्रथम‎ क्रमांक पटकावल्याने त्यांचा मारवड‎ पोलिस ठाण्यात सत्कार करण्यात‎ आला.‎ जळगाव येथे महिला दिनानिमित्त‎ सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन‎ केले होते. यात उपविभागीय पोलिस‎ अधिकारी राकेश जाधव यांच्या पत्नी‎ शुभांगी जाधव, पोलिस उपनिरीक्षक‎ अक्षदा इंगळे, हवालदार रेखा ईशी,‎ पोलिस नाईक स्मिता वाल्हे, पोलिस‎ शिपाई नेहा बारेला, नम्रता जरे, मंगला‎ सूर्यवंशी यांनी या कार्यक्रमात सहभाग‎ घेत जिल्ह्यातून अमळनेर विभागाला‎ प्रथम क्रमांक मिळवून दिला.

‎ त्यानिमित्त मारवड पोलिस ठाण्यात‎ शांताबाई पाटील (करणखेडे), छाया‎ गव्हाणे (पाडसे), मनीषा पाटील‎ (खेडी खु.), तनुजा पाटील (लोण‎ खु.) या महिला पोलिस पाटलांनी‎ त्यांचा सत्कार केला. सूत्रसंचालन‎ भाऊसाहेब पाटील यांनी केले. या‎ वेळी एपीआय जयेश खलाणे,‎ पीएसआय विनोद पाटील, पोलिस‎ नाईक सुनील आगोणे, हवालदार‎ फिरोज बागवान, पोलिस नाईक‎ सुनील तेली, हवालदार भरत इशी,‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ पोलिस नाईक अनिल राठोड, पोलिस‎ पाटील संघटनेचे तालुकाध्यक्ष गोविंद‎ शिंदे, उमाकांत पाटील, आबा‎ वाडिले, जगतराव पाटील आदी‎ उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...