आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचालित शरदचंद्रिका सुरेश पाटील औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयातर्फे प्राचार्य डॉ. गौतम वडनेरे यांच्या मार्गदर्शनानुसार ७ मे रोजी ‘आगाज’ या फ्रेशर्स व फेअरवेल समारोहाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य दिलीप रामू पाटील उपस्थित होते. महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अॅड. संदीप सुरेश पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. व्यवस्थापन परिषद सदस्य तथा नूतन मराठा महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ. एल. पी. देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.
या वेळी मंचावर महात्मा गांधी शिक्षण मंडळाच्या उपाध्यक्षा आशाताई पाटील, प्रा. डि. बी. देशमुख, प्राचार्य डॉ. गौतम वडनेरे आदी उपस्थित होते. दिलीप पाटील यांनी महाविद्यालयात राबवण्यात आलेल्या हायड्रोफाेनिक्स, शेणखत व कापूस वनस्पतींपासून इंधनासाठीची वीटनिर्मिती, प्लॅन्ट टिश्यू कल्चर या विविध उपक्रमांचे कौतुक केले. सातपुड्यातील वन आैषधींवर संशोधन वाढवावे, असे त्यांनी आवाहन केले. महाविद्यालयाच्या नियतकालिकाला उत्कृष्ठ मुखपृष्ठाचा प्रथम पुरस्कार व हिंदी कवितेला ही प्रथम पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांनी विद्यार्थ्यांसह महाविद्यालयाचे कौतुक केले.
कार्यक्रमाला डि. फार्मसी, बी. फार्मसी व एम. फार्मसीचे एकूण ६०० विद्यार्थी उपस्थित होते. अनेक विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला होता. चतुर्थ वर्षाच्या विद्यार्थ्यांनी प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांचे स्वागत केले. या वेळी अध्यक्ष अॅड. संदीप पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. महाविद्यालयात राबवलेल्या विविध उपक्रमांचा विद्यार्थ्यांना लाभ होतो, असे प्राचार्य डॉ. गौतम वडनेरे यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.