आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दखल:अमळनेरातील उपक्रमशील शिक्षकांचा प्रमाणपत्राने गौरव; सीईओ डॉ.आशिया यांची उपस्थिती

अमळनेर14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिक्षण विभाग व व्होवेल्स ऑफ दि पीपल्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने, महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांसाठी मोफत शैक्षणिक साहित्य वाटप व शिकवण्याचे व्हीडिओ तयार करणाऱ्या शिक्षकांचा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याहस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.

जळगावात झालेल्या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी अभिजित राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पंकज आशिया, माध्यमिक शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव, प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील, व्होपाचे संस्थापक ऋतुजा नेवे, उपशिक्षणाधिकारी विजय पवार, राजेंद्र सपकाळे हजर होते. यावेळी ए.बी.धनगर (करणखेडा), संजय पाटील (मंगरुळ), डी.ए.धनगर, एस.ए.खांजोडकर (अमळनेर), रोहन पवार (सावखेडा), महेंद्र पाटील (अमळनेर), संदीप मोरे (दहिवद), माधुरी पाटील, रवींद्र देवरे (अमळगाव), एच.बी.महाजन या शिक्षकांचा प्रमाणपत्र देऊन प्रातिनिधिक स्वरूपात सन्मान करण्यात आला. त्याचप्रमाणे पिंगळवाडे प्राथमिक शाळा व जवखेडा प्राथमिक शाळेला स्वच्छ शाळा पुरस्कार मिळाल्याबद्दल गटशिक्षणाधिकारी एस.पी.चव्हाण यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी भुसावळचे गटशिक्षणाधिकारी वायकोळे, गटशिक्षणाधिकारी सुर्वे, पी.डी.धनगर हजर होते.

बातम्या आणखी आहेत...