आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गौरव:भडगाव तालुक्यातील सात‎ स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान‎

भडगाव‎3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त‎ भडगाव तालुक्यातील सात स्वातंत्र्य‎ सैनिकांना सन्मानित करण्यात आले.‎ तहसील कार्यालयाच्या प्रांगणात‎ ध्वजारोहणानंतर तहसीलदार मुकेश‎ हिवाळे यांच्या हस्ते सातही स्वातंत्र्य‎ सैनिकांच्या वारसांना सन्मानित करण्यात‎ आले.‎ याप्रसंगी गटविकास अधिकारी रमेश‎ वाघ, पालिकेचे मुख्याधिकारी रवींद्र लांडे,‎ पोलिस निरीक्षक अशोक उतेकर, समन्वय‎ समितीचे अध्यक्ष युवराज पाटील‎ व्यासपीठावर उपस्थित होते.

लताताई‎ पाटील, पोलिस निरीक्षक उतेकर, इम्रान‎ अली सय्यद यांनी देशभक्तीपर गीते सादर‎ केले. स्वातंत्र्य सैनिक उत्तमराव देसले‎ यांनी स्वरचित हैद्राबाद मुक्ती संग्राम‎ पोवाडा सादर केला. या कार्यक्रमात‎ स्वातंत्र्य सैनिक स्वर्गीय भालचंद्र सदाशिव‎ जकातदार यांचे वारस विलास मधुकर‎ जकातदार, गिरड येथील स्वातंत्र्य सैनिक‎ स्वर्गीय बळीराम माळजी पाटील यांचे‎ वारस मधुकर बळीराम पाटील, पिंपळगाव‎ येथील स्वातंत्र्य सैनिक स्वर्गीय शंकर‎ देवराम पाटील यांचे वारस सुधाकर शंकर‎ पाटील, तसेच हैदराबाद मुक्ती संग्रामात‎ ज्यांनी उल्लेखनीय कार्य केले असे‎ वयोवृद्ध उत्तमराव मखाजी देसले यांना‎ शाल, श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन तालुका‎ प्रशासनातर्फे सन्मानित करण्यात आले.‎

कार्यक्रमास पीटीसीचे संचालक विनय‎ जकातदार, विजय देशपांडे, नागेश वाघ,‎ दिलीप शेंडे, अॅड. विश्वासराव भोसले,‎ योजना पाटील, रेखा पाटील, नथ्थू अहिरे,‎ गणेश पाटील, माजी सैनिक फेडरेशनचे‎ अध्यक्ष प्रमोद पाटील, सचिव भीमराव‎ माळी व माजी सैनिक व नागरिक‎ उपस्थित होते. या वेळी प्रजापिता‎ विश्वविद्यालयाच्या दीदींनी सर्व‎ मान्यवरांना राखी बांधून रक्षाबंधन सण‎ साजरा केला. तहसीलदार मुकेश हिवाळे‎ यांना उत्कृष्ट तहसीलदार म्हणून‎ प्रशासनातर्फे गौरवण्यात आले. प्रा.डॉ.‎ दीपक मराठे यांनी सूत्रसंचालन केले

बातम्या आणखी आहेत...