आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन:आशा गटप्रवर्तकांना मोबदला द्यावा; चोपडा तहसीलसमोर धरणे आंदोलन, तहसीलदार गावित यांना दिले निवेदन

चोपडाएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

चोपडा तालुक्यातील आशा व गटप्रवर्तक संघटनेतर्फे जिल्हाध्यक्ष अमृतराव महाजन यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. तहसीलदार अनिल गावित यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले.

केंद्र शासनाच्या सुधारीत आदेशान्वये ऑक्टोबर २०२१ पासूनचा कोविड भत्ता एक हजार व गटप्रवर्तकांना ५०० रुपये त्वरित देण्यात यावा, लसीकरणाचाही मोबदला द्यावा, केंद्र सरकारने आशा व गट प्रवर्तकांचे मानधन २०१६ पासून वाढवलेले नाही त्यात वाढ करून किमान वेतन १८ हजार रुपये द्या, आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांचा नियमित मोबदला ऑक्टोबर २०२१ पासून थकीत आहे. तो अदा करावा अशा विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले.

मीनाक्षी सोनवणे, वंदना पाटील, शीतल पाटील, विद्यादेवी बाविस्कर, उज्वला बोरसे, जयश्री मोरे, अनिता पाटील, गिरीश महाजन, रूपाली पाटील, शालिनी पाटील, मनीषा पाटील, भारती कोळी, उर्मिला सैंदाणे, ललिता बाविस्कर, महेंद्र धनगर, किरण पाटील आदींचा आंदोलनात सहभाग होता.