आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरकारी रुग्णालय फुल्ल:साथीच्या आजारांनी रुग्णालये फुल्ल; ​​​​​​​ विषमज्वर, मलेरिया, टायफॉइडचे रुग्ण वाढले

अमळनेर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पावसाळ्यात वेगाने प्रसार हाेणाऱ्या साथ आजारांनी तालुक्यात पाय पसरल्याचे दिसून येत आहे. विषमज्वर, मलेरिया, टायफाइड रुग्णांची तालुक्यातील रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे खासगी तसेच सरकारी रुग्णालय फुल्ल झाले आहेत. तर नागरिकांनी काळजी घ्यावी, विशेष करुन लहान मुलांना जपावे, असा सल्ला आराेग्य विभागाकडून देण्यात येत आहे. पावसाळ्यात टायफाइड आजाराचे प्रमाण वाढल्याचे दिसून येते. या आजाराचा प्रसार दूषित अन्न तसेच पाण्यामुळे हाेत असताे. म्हणूनच स्वच्छ अन्न पदार्थांचे सेवन करणे व गरम अन्न खाणे आवश्यक असते.

तत्काळ डाॅक्टरांचा घ्यावा सल्ला
उच्च तापमान दर्शवणारा ताप किंवा कमी-अधिक होणारा ताप ही विषमज्वराची लक्षणे आहेत. काहींना उलट्या किंवा जुलाबही होतात. अलीकडे काही जणांना मलमूत्र विसर्जन करताना जळजळ जाणवते. अशा व्यक्तींनी तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि सॅल्मोनेलासाठी जीवाणूचे अस्तित्व जाणून घेण्यासाठी ब्लड कल्चर चाचणी करावी. यामुळे एखाद्याला टायफाइड आहे का? त्याचं निदान होतं आणि त्यानुसार उपचार करता येतात.

बाहेरचे पदार्थ खाऊ नयेत
प्रतिबंधात्मक उपाय म्हणून अस्वच्छ वातावरणातील अन्न पदार्थांचे सेवन करू नये. कुठलंही पाणी पिणं टाळावे. अन्न पदार्थ गरम करून खावेत आणि काही महिने बाहेरचे पदार्थ खाऊ नयेत.
डॉ. प्रकाश ताडे, वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रुग्णालय.

बातम्या आणखी आहेत...