आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्गदर्शन:पारोळ्यात युवती चेतना शिबिराला मोठा प्रतिसाद‎

पारोळा‎19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

देवगिरी कल्याण आश्रमातर्फे‎ नुकतेच युवती चेतना शिबिर झाले.‎ यात शहरातील ९० युवतींनी सहभाग‎ नोंदवला.‎ युवती ही उद्याची सशक्त, समर्थ‎ स्त्री व्हावी तसेच भारतीय‎ संस्कृतीची वाहक बनावी या‎ उद्देशाने या शिबिराचे आयोजन‎ करण्यात आले होते.‎ बोहरा सेंट्रल स्कूलच्या आवारात‎ एक दिवसीय निवासी वर्गात‎ युवतींसाठी प्रार्थना, बौद्धिक वर्ग,‎ खेळ, एकत्रीकरण, परिचय असा‎ दिनक्रम होता. डॉ. विद्या अहिरे यांनी‎ हिमोग्लोबीन तपासणी केली. प्रथम‎ सत्रात संजय कुलकर्णी यांनी मुलींना‎ सामाजिक, आर्थिक तथा शैक्षणिक‎ मार्गदर्शन केले. धर्म, संस्कार,‎ संस्कृती या विषयावर हर्षल पाटील‎ यांनी प्रबोधन केले. राकेश शर्मा‎ यांनी नारी सन्मान या विषयावर‎ मार्गदर्शन केले.‎

बातम्या आणखी आहेत...