आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पतीस अटक:जवखेडा येथे पत्नीच्या खून प्रकरणी पतीस अटक

एरंडोल3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

किरकोळ वादातून संतप्त झालेल्या पतीने लाकडाच्या दांड्याने मारहाण केल्यामुळे पत्नीचा मृत्यू झाल्याची घटना जवखेडा येथे २ जून रोजी घडली होती. या प्रकरणी पोलिसांनी महिलेच्या पतीस अटक केली आहे.

बाळू भाया बारेला हा पत्नी भुरकीबाई बारेला व सहा मुलांसह जवखेडा येथे एका शेतात राहत हाेता. शेतीची कामे करून तो आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करत होता. २ जून रोजी भुरकीबाई यांचा भाऊ सुरसिंग फुलसिंग बारेला यास सकाळी ७ वाजता कैलास बारेला यांनी मोबाइलवरून तुमची बहिण भुरकीबाई बारेला (वय ३०) हिचा मृत्यू झाला आहे, तसेच तुमचे मेहुणे बाळू बारेला हे मृतदेह घेऊन मूळगाव असलेल्या बडवाणी जिल्ह्यातील झापडीमल्ली (ता. वरला) येथे घेऊन जात असल्याचे सांगीतले.

त्यानंतर आई व भाऊ हे झापडीमल्ली येथे पोहोचले. तेथे भुरकीबाई यांचा मृतदेह गुंड्या बारेला यांच्या घरात ठेवला होता. बाळू बारेला व त्यांच्या मालकाने गाडीतून हा मृतदेह आणला असून बाळू हा मृतदेह टाकून पळून गेला. तर मालक गाडी घेऊन निघून गेल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, बाळू बारेला हा पत्नी भूरकीबाई यांना रात्री १० वाजता लाकडाच्या दांड्याने मारहाण करत होते. तर नूचडिया बारेला हे समजावला गेला असता त्यांनाही मारण्याच्या प्रयत्न केल्याचे कैलास बारेला याने सुरसिंग बारेला यांना सांगितले. याबाबत सुरसिंग बारेला यांनी वरला (जि. बडवानी) येथे तक्रार दाखल केल्यानंतर एरंडोल पोलिसांत बाळू बारेला विरुद्ध कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. पाेलिसांनी बाळू बारेलास ताब्यात घेतले आहे.

बातम्या आणखी आहेत...