आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिलासा:बंधाऱ्यांच्या पाट्या काढल्यास लवकरच अक्कलपाड्यातून मिळणार आवर्तन, 85 गावांची दूर होणार टंचाई; अमळनेरच्या पांझरा काठावरील गावांना लाभ

अमळनेर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पांझरा नदीवरील कोल्हापूर बंधाऱ्याच्या फळ्या मोकळ्या करा, असे आदेश धुळे येथील जिल्हाधिकाऱ्यांनी ६ मे रोजी झालेल्या बैठकीत दिले. दरम्यान, हे काम न केल्यास पाणीटंचाईला विलंब होवून, त्यास पाटबंधारे विभाग जबाबदार राहिल, असे त्यांनी स्पष्ट केले. यामुळे पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर लवकरच पांझरा नदीतून आवर्तन सुटण्याची चिन्हे दिसत आहेत. तर पाट्या काढण्यासाठी ११ मे ही शेवटची मुदत आहे.

टंचाईच्या पार्श्वभूमीवर अक्कलपाडा धरणातून धुळे, शिंदखेडा व अमळनेर तालुक्यातील सर्व गावांकरिता पांझरा नदीपात्रात पाणी सोडण्याचे नियोजन झाले आहे. तर धुळे पाटबंधारे विभागाच्या अधिपत्याखालील पांझरा नदीवरील कोल्हापूर बंधाऱ्यात शेतकरी पाणी अडवून धरतात. यामुळे पुढील गावांना पाणी पोहोचत नाही, त्यामुळे वाद होतात.

या बांधऱ्याच्या फळ्या काढण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले असून या कोल्हापूर बंधाऱ्यावरील फळ्या काढण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. ११ मे पर्यंत हे काम पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश आहेत.

बातम्या आणखी आहेत...