आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:कृष्णापुरी भागातील पूर्ण अतिक्रमण तत्काळ काढा; मुख्याधिकाऱ्यांकडे केली स्थानिक महिलांनी मागणी

पाचोरा17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील कृष्णापुरी भागातील काही घरांचे अतिक्रमण काढण्याचे काम पूर्ण करावे, समोरील प्लॉटधारकांचे अतिक्रमणही काढून गल्लीत भूमिगत गटारी कराव्या, आदी विविध मागण्यांसाठी गुरुवारी स्थानिक महिलांनी नगर परिषदेच्या मुख्याधिकारी व प्रशासक शोभा बाविस्कर यांना निवेदन दिले.

कृष्णापुरी भागातील अतिक्रमण संपूर्ण गल्लीत निघाले. परंतु जेथे गल्लीत जाण्यासाठी सुरुवात होते त्या घराचे अतिक्रमण न काढून नागरिकांवर अन्याय केला. तो त्वरित काढून तातडीने भूमिगत गटारीचे बांधकाम करावे, राहिलेले अतिक्रमण व गल्लीत सोडलेल्या सांडपाण्यामुळे काही जिवितहानी झाली तर त्यास पालिका अधिकारी व कर्मचारी जबाबदार राहतील, असेही महिलांनी निवेदनात स्पष्ट नमूद केले आहे.

बातम्या आणखी आहेत...