आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील मांडकी खुर्द हे गाव गेल्या १०-१२ वर्षांपासून पुनर्वसनासाठी प्रस्तावित आहे. त्यासाठी ग्रुप ग्रामपंचायत असलेल्या पुनगाव शिवारातील गट नंबर १२ मधे गावठाण निश्चित केले असून त्या जागेवर ग्रामपंचायतीने १२ ते १५ लोकांना शासकीय घरकुल योजनेचा लाभ दिला आहे. उर्वरित जागा पुनर्वसनासाठी आहे. मात्र त्या जागेवर गावातील सधन नागरिकांनी शेड, गोठे, खळं तयार करून अतिक्रमण केले आहे. या जागेवरील अतिक्रमण काढण्यात यावे, अशी मागणी एकलव्य संघटनेने केली आहे.
या संदर्भात प्रदेश कार्याध्यक्ष सुधाकर वाघ यांचे नेतृत्वात ५५ आदिवासी भिल्ल समाजबांधवांनी उपविभागीय अधिकारी डॉ विक्रम बांदल यांना निवेदन देऊन केली आहे. सदर अतिक्रमण तत्काळ न काढल्यास संघटनेमार्फत मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. मांडकी खुर्द गावात सुमारे ९० टक्के आदिवासी भिल्ल समाजाचे वास्तव्य असून या जागेवर गावातील अनेक नागरिक अतिक्रमण करून सदरची जागा बळकावत आहेत.
त्यांना विचारण्यासाठी गेल्यास ते मारण्याच्या धमक्या देतात. त्यामुळे शासनाने त्या जागेवरील अतिक्रमण हटवून त्या जागेचे मोजमाप करावे व तेथे घरे बांधून आदिवासी भिल्ल समाजाला न्याय मिळवून द्यावा, असे आवाहन केले आहे. निवेदनावर समाजबांधवांच्या सह्या असून त्याच्या प्रती तहसीलदार, पोलिस निरीक्षक व आमदार किशोर पाटील यांना देण्यात आल्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.