आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कानबाईला निरोप:आडगावात कानबाईचे उत्साहात विसर्जन

चोपडा14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील आडगाव येथे सतखेडेकरवाड्यात व गोहिल वाड्यात कानबाईची स्थापना करण्यात आली होती. दोन दिवस मनोभावे पूजा केल्यानंतर सोमवारी कानबाईला निरोप देण्यात आला.

सकाळी नऊ वाजता सतखेडे वाड्यात भागवत जयसिंग पाटील यांच्या घरी बसवलेल्या कानबाईला गुर्जर व अहिराणी भाषेत गाणी म्हणून, महिलांनी फुगड्या खेळून, मिरवणुकीद्वारे निरोप देण्यात आला. यावेळी तिवसाबाई पाटील, नबाबाई पाटील, अंजुबाई पाटील, कमलबाई पाटील, मीरा पाटील, अलका पाटील, लावण्या पाटील, रजूबाई पाटील, ज्योती पाटील, आशाबाई पाटील, रंजना पाटील, यमुनाबाई पाटील, रेखाबाई पाटील, निर्जलाबाई पाटील, यशोदाबाई माळी, निलाबाई पाटील, उषाबाई पाटील, वंदनाबाई पाटील, गंगुबाई पाटील, आशा माळी, हिराबाई पाटील आदींनी नृत्य करत निरोप दिला. या वेळी तरुणींची माेठी उपस्थिती हाेती.

बातम्या आणखी आहेत...