आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रब्बी पिकांची पेरणी:अमळनेरात रब्बीचे क्षेत्र 9 हजार हेक्टरने वाढणार ; तालुका कृषी विभागाने व्यक्त केला अंदाज

अमळनेर5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गतवर्षी १६ हजार हेक्टरपर्यंत तालुक्यात रब्बी पिकांची पेरणी झाली होती. यंदा मात्र अद्यापही पेरणीचे क्षेत्र कमी दिसत असले, तरी आगामी महिनाभरात यात आणखी भर पडणार आहे. यंदा जास्तीत जास्त २५ हजार हेक्टरपर्यंत पेरणी होईल असा कृषी विभागाचा अंदाज आहे.

कृषी विभागाच्या अहवालानुसार सोमवारपर्यंत तालुक्यात ३ हजार २८० हेक्टर क्षेत्रावर हरभरा, ज्वारीची, मका या पिकांची पेरणी झाली. ऑक्टोबर महिन्यात पावसाने हजेरी लावल्याने जमिनीत ओलावा वाढला. त्यामुळे यंदा गहू, हरभरा व मका या पिकांची पेरणी वाढली. तालुक्यात १०३८ हेक्टर क्षेत्रावर इतर पिकांची पेरणी झाली आहे.

परतीच्या पावसाने फायदा कपाशीपेक्षा कमी खर्चात व कमी पाण्यात रब्बी पिके येतात. त्यात परतीच्या पावसाने तर रब्बी हंगाम थोडा तरला आहे. हा पाऊस झाला नसता तर निम्मेच क्षेत्रावर पेरणी झाली असती. मात्र गतवर्षाच्या तुलनेत अत्यंत कमी का होईना पण शेतकऱ्यांचा हंगाम साधला जाणार आहे. ए.एस.खैरनार, मंडळाधिकारी

बातम्या आणखी आहेत...