आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवी रचना:चाळीसगावात 2 गट, 4 गण वाढले; आता बदलणार राजकीय समीकरणे ; नव्या गण, गटाने बदलास वाव

चाळीसगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदार संघाच्या नव्या प्रारूप रचनेत तालुक्यात दोन गट व चार गण वाढले आहेत. तालुक्यात ९ गट व १४ गण झाले आहेत. एकूणच मतदार संघाची रचना पाहता जिल्हा परिषद प्रभाग रचनेत गावांची काटछाट झाल्याने उमेदवारांचा कस लागणार आहे. वाढलेल्या गट व गणातील राजकीय समीकरणे बदलतील. जोडलेल्या नव्या गावात इच्छुकांना बांधणी करावी लागेल. सन २०११च्या जनगणनेनुसार चाळीसगाव तालुक्याची लोकसंख्या ३ लाख १७ हजार ३२८ इतकी आहे. त्यात अनुसूचित जाती ३१ हजार ४४२ तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या ४२ हजार ३४२ इतकी आहे. दरम्यान, या रचनेवर ८ जूनपर्यंत हरकती व सूचना मागवण्यात आल्या आहेत. दहिवद, करगाव व देवळी गण रद्द नव्या रचनेत घोडेगाव हा स्वतंत्र गट झाला आहे. त्यासाठी घोडेगावसह वलठाण या नवीन गणाची निर्मिती झाली आहे. अगोदरच्या पिपंपरखेड, रांजणगाव गटातील गावे या गणाला जोडली असली तरी घोडेगावसह वलठाणच्या इच्छुकांसाठी ती फायद्याची व सोयीची आहेत. याशिवाय हातले, भोरस, वरखेडे, पिलखोड, हिरापूर, घोडेगाव, वलठाण हे गण ही नव्याने अस्तित्वात आले आहेत. तसेच दहिवद, करगाव व देवळी हे गण रद्द झाले आहेत. तसेच पूर्वीचे नाव बदलून मेहरूणबारे-वरखेडे बुद्रुक, पिलखोड-सायगाव, टाकळी प्र.चा.- पातोंडा, वाघळी-हातले, तळेगाव-हिरापूर हे गट अस्तित्वात आहेत.

वाघळी सर्वात मोठा तर टाकळी सर्वात लहान गट नव्या प्रारूप रचनेत वाघळी हा सर्वात मोठा गट तर टाकळी प्रचा सर्वात लहान गट ठरला आहे. वाघळी गटात एकूण २३ गावे असून त्या खालोखाल नव्याने अस्तित्वात आलेल्या घोडेगाव गटात १९ गावे आहेत. सर्वात लहान गट ठरलेल्या टाकळी प्रचा गटात केवळ ९ गावे असून त्यामुळे या लहान गणात लढणाऱ्या इच्छुकांसाठी हे फायद्याचे ठरणार आहे.

पातोंडा, मेहुणबारे गणात ४ तर हातलेत१५ गावे नवीन गण रचनेत मेहुणबारे गणात शिदवाडी, धामणगाव, दहिवद, मेहुणबारे ही चार मोठी गावे तर उंबरखेड गणात शिरसगाव, आडगाव, देवळी व उंबरखेड व पातोंडा गणात ओझर, वाघडू, तरवाडे व पातोंडा अशी प्रत्येकी ४ गावे आहेत. तर नव्याने अस्तित्वात आलेल्या हातले गणात सर्वाधिक १५ गावे तर त्या खालोखाल वरखेडे गणात १३ गावे आहेत.

पूर्वीचे हे गट, गण कायम पूर्वी तालुक्यात जिल्हा परिषदेचे सात गट व पंचायत समितीचे १४ गण होते. या प्रारूप रचनेत पूर्वीच्या गटांमध्ये असलेली गावे नव्याने उदयास आलेल्या गटांमध्ये टाकण्यात आली आहेत. पूर्वीच्या गटांपैकी बहाळ- कळमडू व पिंपरखेड -रांजणगाव हे गट कायम राहिले आहेत. तर गणांमध्ये बहाळ, कळमडू, वाघळी, मेहुणबारे, टाकळी प्रचा, उंबरखेड, सायगाव, पिंपरखेड, ऱांजगणाव, तळेगाव, पातोंडा हे गण कायम राहिले.

बातम्या आणखी आहेत...