आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाऊस:चाळीसगावात अर्धातास वादळी पाऊस, वृक्ष उन्मळले तर ग्रामीण भागात मात्र पाऊस नव्हता

चाळीसगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहराला गुरुवारी दुसऱ्यांदा प्रचंड वादळासह पावसाने झोडपून काढले. शहरासह परिसरात सकाळपासूनच प्रचंड उकाडा जाणवत होता. दुपारी अचानक हवामानात बदल झाला. सायंकाळी पाच ते साडेपाच वाजेदरम्यान वादळासह पाऊस कोसळला. जवळपास अर्धातास हा पाऊस सुरू होता. मात्र पावसापेक्षा वादळ अधिक होते. दरम्यान, शहरात वादळासह पाऊस कोसळत असतांना ग्रामीण भागात मात्र पाऊस नव्हता. दरम्यान, चोपडा शहरातही रात्री १५ मिनिटे पाऊस झाला. वीजपुरवठा खंडित शहरात या वादळामुळे अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले आहेत. तसेच वीजपुरवठा उशिरापर्यंत खंडीत झालेला होता. दोन दिवसांपूर्वी शहरासह परिसरात गडगडाटासह मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली होती. त्यानंतर गुरुवारी पावसाने शहराला जोरदार तडाखा दिला. पालिकेसमोरचे मोठे झाड वादळाने पडल्याने दुचाकी दाबली गेली. तसेच दुकानावर झाड कोसळल्याने नुकसान झाले. वीज कर्मचारी दुरुस्तीचे काम करत होते.

बातम्या आणखी आहेत...