आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समस्या बिकट:चाळीसगावात रस्त्यांवरील खोदकामाने धुळीचे लोट ; श्वसनाच्या विकारांचा धोका वाढला

चाळीसगाव5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आधीच खड्ड्यांमुळे शहरातील रस्त्यांची स्थिती बिकट झाली आहे. त्यात आता पावसाळा संपताच रस्त्यांवर धुळीचे लोट उठत आहेत. त्यामुळे चाळीसगावातील रहिवाशांना श्वसनाच्या विकारांचा धोका निर्माण झाला आहे. शहरात सुधारीत पाणीपुरवठा योजना व भुयारी गटारींची कामे सुरू असल्याने, सर्वच भागातील रस्त्यांचे कामे गेल्या दोन वर्षांपासून खोदकाम झाले आहे. त्यामुळे रस्त्यांवर जागोजागी खड्डे निर्माण झाले आहेत. पावसाळ्यात तर खड्ड्यांमुळे नागरीकांचे प्रचंड हाल झाले.

त्यामुळे ही कामे कधी पूर्ण होतात, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे. दुर्दशा झालेल्या रस्त्यांचे भाग्य कधी उजाळणार, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. आता पावसाळा संपल्याने शहरातील सर्वच रस्त्यांवर खड्ड्यांमुळे धुळीचा त्रास वाढला आहे. वाहनधारकांसोबत दुकानदारांना देखील हा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे पालिकेने रस्त्यांचे खोदकाम थांबवून, अपूर्ण कामे त्वरीत पूर्ण करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. रस्त्याच्या कामांमुळे दुकानदारांच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. त्यामुळे पालिकेने समस्या सोडवणे गरजेचे आहे.

दिवाळीच्या काळातही खड्डेमय रस्त्यांमुळे नागरिकांना आतोनात त्रास सहन करावा लागला. ऐन सणावारात खड्डेमय रस्त्यांमुळे खरेदीसाठी घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांची गैरसोय झाली. आता पालिका प्रशासनाने कोणतेही कारण न देता, रस्त्यांच्या कामांना प्राधान्य द्यावे, अशी मागणी आहे.

बातम्या आणखी आहेत...