आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन‎:चिंचपुरा, मुसळी येथे बसेसला थांबा‎ मिळण्यासाठी ग्रामस्थांनी घातले साकडे‎

धरणगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

धरणगाव‎ चिंचपुरा, मुसळी येथे बसेसला थांबा‎ मिळावा, यासाठी धरणगाव बस स्थानकाचे‎ वाहतूक नियंत्रक प्रल्हाद चौधरी यांच्याकडे‎ चिंचपुरा व मुसळी येथील ग्रामस्थांनी यांनी‎ लेखी निवेदन सादर करुन त्यांना साकडे‎ घातले.‎ या प्रसंगी संभाजी शंकरराव सोनवणे,‎ दिलीप जगन्नाथ पाटील, सुनील अर्जुन‎ माळी, विवेक प्रकाशराव पाटील, दीपक‎ प्रकाश मराठे, सूरज किसन वाघरे, लक्ष्मण‎ प्रभाकर पाटील आदी उपस्थित होते.‎ निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यातील‎ चिंचपुरा व मुसळी येथे बस थांबा आहे.‎ तरी देखील या ठिकाणी बसेस थांबत‎ नाहीत.

बस वेळेवर न मिळाल्याने अनेक‎ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.‎ तसेच नोकरी, व्यवसायानिमित्त ये-जा‎ करणाऱ्या व्यक्तींना ही याचा नेहमीच त्रास‎ हाेतो. धुळे आगारातून सुटणाऱ्या अनेक‎ गाड्यांना चिंचपुरा, मुसळी येथे थांबाच‎ नाही. तिकिट काढणाऱ्या यंत्रात पिंप्रीनंतर‎ डायरेक्ट पाळधीचा पर्याय उपलब्ध असतो.‎ त्यामुळे या दोन्ही गावांना बस थांबली‎ पाहिजे, तसेच धुळे आगारातून सुटणाऱ्या‎ गाड्यांच्या वाहकाजवळील यंत्रात या‎ गावांचा पर्याय उपलब्ध करून द्यावा,‎ यासंदर्भात वाहतूक नियंत्रक प्रल्हाद चौधरी‎ यांनी निवेदन दिले. एरंडोलच्या आगार‎ प्रमुखांकडे निवेदन देऊन या वेळी समस्या‎ सोडवण्याचे चाैधरी यांनी आश्वासन दिले.‎

बातम्या आणखी आहेत...