आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धूम:फर्दापूर शिवारात कोरड्या विहिरीतून बाहेर उडी घेत बिबट्याने ठोकली धूम

वाकोद14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

फर्दापूर शिवारात राखीव जंगलातील कोरड्या विहिरीत बिबट्या पडल्याची माहिती, १५ रोजी सकाळी वनविभागाला मिळाली. त्यानुसार पथकाने घटनास्थळ गाठले. मात्र, पथकासोबत घटनास्थळी बघ्यांचीही गर्दी झाली. त्यामुळे बिथरलेल्या बिबट्याने विहिरीतून बाहेर उडी घेत जंगलात धूम ठोकली. तत्पुर्वी बिबट्याने वार्तांकनासाठी आलेल्या एका बातमीदारावर हल्ला करण्याचाही प्रयत्न केला. बुधवारी दिवसभर बिबट्याचा थरार सुरू होता. मात्र, प्रयत्न करूनही बिबट्याला जेरबंद करण्यात वनिभागाला यश आले नाही. या घटनेत अनिल रावळकर यांच्यावर बिबट्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने मांडीवर खरचटण्याखेरीज त्यांना गंभीर दुखापत झाली नाही. फर्दापूर शिवारातील गट क्रमांक २३२ मधील शेख ईस्माईल शेख यांच्या शेतातील विहिरीत बिबट्या पडला होता. अजिंठा वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. बिबट्याला जेरबंद करण्याची तयारी करत असतांनाच विहिरीच्या कपारीतून बिबट्या अचानक बाहेर आला, अन् त्याने धूम ठोकली.

बातम्या आणखी आहेत...